टॉप न्यूज़महाराष्ट्रराजनीतिराज्य
डोंबिवलीतील मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांची पक्षाला सोडचिठ्ठी
डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी शुक्रवारी मनसेच्या पक्ष सदस्यत्वाचा आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना दिला. या राजीनाम्यामुळे प्रकाश भोईर यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे..




