महाराष्ट्र

Local Bodies OBC Reservation: राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा

OBC Reservation

Local Bodies OBC Reservation: सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या 50 टक्क्यांच्या मर्यादेचे पालन झालेच पाहिजे, असा निर्णय दिला तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

Local Bodies OBC Reservation: सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा लागू करण्याचा निर्णय दिला तर राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येईल, असे मत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी व्यक्त केले. राज्यात आरक्षणाला 50 टक्केची अटक लागली तर एक दिवस ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) शून्यावर येईल, असे त्यांनी म्हटले. ते बुधवारी नागपूर येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!