टॉप न्यूज़महाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़
अंबरनाथ नगराध्यक्ष निवडणूक मत विभाजनाचा फायदा भारतीय जनता पार्टीला जाहीर झालेल्या निकाला प्रमाणे अंबरनाथ नगर – परिषद सार्वत्रिक निवडणूक- २०२५

या निवडणुकी मध्ये झालेल्या मतदानाच्या टक्केवारी पहिली तर असे आदळून येते कि शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट मतविभाजन झाल्या मुळे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पत्नी मनीषा अरविंद वाळेकर साधारण ७५०० च्या फरकाने पराभूत झाल्या.
अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत थेट सामना झाला होता.शिवसेनेकडून मनीषा वाळेकर ,तर भाजप कडून तेजश्री करंजुळे यांच्यात अटीतटिची लढत झाली.मात्र तेजश्री यांनी ५४०८६ मतांनी बाजी मारली आहे.

या निवडणुकीत काँग्रेसच्या नूतन पाटील यांना २९,५९३ मते मिळाली,ज्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन झाल्याचे बोलले जात आहे.तसेच २,२८२ मतदारांनी ‘नोटा’चा (NOTA )वापर केला आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेची मोठी ताकद असतानाही भाजपने केलेला हा विजय जिल्ह्याच्या हा राजकारणात अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.


