Uncategorized
Gaint Killer: शिंदे सेनेला अंबरनाथ मध्ये जोरदार धक्का…शहर प्रमुखाच्या पत्नीस दिली मात…

Thane Jilha: अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत थेट सामना झाला होता. शिवसेनेकडून मनीषा वाडेकर, तर भाजपकडून तेजश्री करंजुळे यांच्यात अटीतटीची लढत झाली.मात्र, तेजश्री यांनी विजय मिळवला.
या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. अंबरनाथ नगरपरिषदेत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जाहीर सभा झाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
मतदारांनी भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांना कौल देत नगराध्यक्ष पदावर मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. दरम्यान या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांनी जल्लोष करत विजय सादरा केला.