महाराष्ट्रराजनीति

मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे. राज्यात युती आणि आघाडीची खिचडी झालेली दिसत आहे. कोणता पक्ष कोणासोबत निवडणुका लढवणार हे जाहीर झाल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटत आहे. तर, उमेदवारीवरून अनेक पक्षांमध्ये नाराजी वाढत असून, बंडखोरी होत आहे. यातच राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. यानतंर आता भाजपा नेत्यांनी ठाकरे बंधूंना आकडेवारी दाखवत डिवचले आहे.

मुंबई महापालिकेत भाजप १३७ तर शिंदेसेना ९० जागा लढविणार आहे. काँग्रेसने ८७ जागा जाहीर केल्या तर उद्धव-राज यांच्या युतीने नावे जाहीर न करता ए बी फॉर्म देऊन टाकले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पनवेल वगळता खऱ्या अर्थाने सर्वत्र स्वबळ अजमावत आहे. यावरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आकडेवारी दिली आहे. यावरून ठाकरे बंधूंच्या युतीवार निशाणा साधला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!