देशमहाराष्ट्रराजनीतिराज्य

शिंदेच्या दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग; अंबरनाथ, बदलापूरमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष

Badlapur and Ambernath Nagarparishad Election Result

Badlapur and Ambernath Nagarparishad Election Result गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून आता चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांमध्ये भाजपाने विजय मिळवला असून हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या बालेकिल्ल्यातील नेमकं चित्र काय ते पाहुया.

बदलापुरातील चित्र काय?
बदलापुरात शिंदेंच्या शिवसेनेचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. तर नगराध्यक्ष पदी भाजपाच्या रूचिता घोरपडे विजयी झाल्या आहेत आणि भाजपाचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार) तीन नगरसेवक विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतील पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांच्या कुटुंबात ६ जणांना तिकीट मिळाले होते. मात्र, निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील तिघांचा पराभव झाला आहे.

यात वामन म्हात्रे यांचा स्वतःचादेखील पराभव झाला आहे. त्यांच्या पत्नी विणा म्हात्रे यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला असून त्यांना स्वतःला प्रभाग क्रमांक १९ ब मधून फक्त १६१४ मते मिळाली आहेत. शिवसेनेचे स्थानिक नेते वामन म्हात्रे यांचे बंधू तुकाराम म्हात्रे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर पाटील निवडणूक लढवत होते. ते विजयी झाले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान पैसे वाटण्याच्या प्रकरणावरून प्रभाकर पाटील आणि तुकाराम म्हात्रे यांच्यात हातापायीदेखील झाली होती. तुकाराम म्हात्रे यांनी ३०६१ मते मिळवत प्रभाकर पाटील यांचा पराभव केला. पाटील यांना केवळ १२५८ मते मिळाली आहेत.

अंबरनाथमधील चित्र काय?
अंबरनाथमध्ये भाजपाचा दणदणीत विजय झाला आहे. याठिकाणी भाजपाच्या तेजश्री करंजुले आणि शिंदे गटाकडून मनीषा वाळेकर यांच्यात लढत होती. यात करंजुले विजयी झाल्या आहेत. अंबरनाथमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. याठिकाणी तेजश्री करंजुले यांनी सहा हजार मतांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!