महाराष्ट्रराजनीति

आधी शिंदे गट, मग भाजपा अन् अखेर अजित पवार गट; गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारानं ८ दिवसांत बदलले तीन पक्ष; प्रकरण काय?

Man Switches 3 Parties In 8 Days Municipal elections

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी सुरू आहेत. महापालिका निवडणुकीतील तिकीटवाटपावरून मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांना पक्षाने तिकीट नाकारल्याने पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशीच घटना ठाण्यातही घडल्याचे पाहायला मिळाले. ठाणे महापालिका निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने अवघ्या आठ दिवसांत तीनदा पक्ष बदलला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने अवघ्या आठ दिवसांत दोनदा पक्षांतर केले आणि अखेर तिकीट मिळवण्यात यश मिळवले. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, मयूर शिंदे या उमेदवाराने ३० डिसेंबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (एनसीपी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष बाब म्हणजे ठाण्यातील जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून शिंदे यांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

मयूर शिंदे २२ डिसेंबरपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत होते. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी त्यांनी सावरकर नगर (प्रभाग क्रमांक १४) मधून उमेदवारी मिळविण्याच्या आशेने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मात्र, भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी होताच त्यांनी शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा पलटी मारली आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. अखेर राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी जाहीर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!