KDMC मध्ये महायुतीचे 8 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाण, श्रीकांत शिंदेंची यशस्वी खेळी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने मतदानापूर्वीच आघाडी घेतली आहे. भाजपचे पाच आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीची घोडदौड आधीच सुरू झाली आहे.
१२२ सदस्यसंख्या असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनासाठी किमान ६२ जागांची आवश्यकता आहे. सध्या बिनविरोध निवडून आलेल्या आठ जागांमुळे महायुती सत्तेच्या आकड्यापासून केवळ ५४ जागा दूर आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होण्याआधीच महायुतीने सत्तेच्या दिशेने ठोस पाऊल टाकल्याचे चित्र आहे.
याआधी भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची निवडणूक रणनीती यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले होते. आता शिवसेनेचेही तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळीही फळाला आल्याचे मानले जात आहे.



