Uncategorized

Narayan Rane : ‘बाळासाहेबांनी मला थांबवलं, नाहीतर मी उपशाखाप्रमुखाची हत्या करणार होतो’; नारायण राणेंनी सांगितला धक्कादायक प्रसंग

मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असून भाजपला रोखण्यासाठी ही रणनीती ठाकरेंनी केली आहे. तर त्यांना रोखत भाजपने कोकणी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मास्टर प्लॅन आखला होता. त्यांनी मुंबईत कोकणी मतांची धुरा खासदार नारायण राणेंच्या खांद्यावर सोपवली होती. ठाकरेंनी शह देण्यासाठी ही रणनीती आखली होती. यामुळे सध्या भाजपमध्ये मुंबईत उत्साहाचे वातावरण तयार झाले असतानाच नारायण राणेंनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचदरम्यान नारायण राणेंनी आणखी एक धक्कादायक किस्साही सांगितल्याने आता राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

रायगडसह सोलापुरमध्ये राजकीय वादातून दोघांच्या हत्या झाल्या आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे. अशातच सिंधुदुर्ग येथे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आपल्या भाषणात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा किस्सा सांगत धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी ‘मी एका उपशाखाप्रमुखाची हत्या करणार होतो, पण त्यावेळी बाळासाहेबांनी मला समजावलं आणि मी त्याला जीवनदान दिले. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित कणकवलीतील सभेत त्यांनी हा किस्सा सांगितला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!