महाराष्ट्र

16 लाखांच्या बाईकवरुन ‘भंगार’ रिलस्टार करायचा स्टंट, मुलींना छेडायचा; अटकेनंतर हात जोडून मागितली माफी

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरुन फेमस होण्याची जणू स्पर्धा आणि याड लागल्याचं दिसून येत आहे. लहान सहान व्यवसाय करणारे तरुण किंवा कॉलेजमधील तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून रिल्स बनवून आपला चाहता वर्ग तयार करत आहेत. अनेकदा, रिल्स (Reel) बनवून दहशत पसरविण्याचा प्रकारही घडतो आहे. तर, अनेकजण स्टंट करुन हवा करण्याचा प्रयत्न करतात. छत्रपती संभाजीनगरमधील एका बाईक रायडरला पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. स्पोर्ट्स बाईकवर मुलींसोबत प्रँक करणारा हा रायडर महाविद्यालय परिसरात तरुण मुलींची छेड काढायचा, मुलीजवळ जाऊन स्पोर्ट बाईकचा आवाज काढायचा आणि आक्षेपार्ह बोलायचा. विशेष म्हणजे या घटनेचे रील्स तयार करून स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही ते रील्स तो व्हायरल करायचा. याबाबत पोलिसांनी (Police) या रिल्सची दखल घेत बाईक रायडर समीर शेखवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

शेख समीर शेख सलीम असे बाईक रायडरचे नाव असून त्याच्याकडी बाईकची किंमत तब्बल 16 लाख रुपये असल्याची माहिती आहे. तर, शेख समीर हा भंगारचा व्यवयाय करत असून रीलस्टार देखील आहे. इंस्टाग्रामवर त्याचे दीड लाख फॉलोअर्स असून हे फॉलोअर्स आणखी वाढावे यासाठी तो असे रंजक आणि स्टंटबाज रिल्स बनवतो. त्यामुळे, पोलिसांनी रिल्सस्टार शेख समीरसह त्याच्यासोबत रील तयार करणाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दणका देताच या तरुणाने आपण केलेल्या चुकीचा व्हिडिओ करत माफी देखील मागितली आहे. मात्र, या तरुणाची प्रोफाइल बघितल्यावर तुम्हाला देखील धक्का बसेल. कारण, तो तब्बल 16 लाखांची स्पोर्ट बाईक वापरत होता.

कोण आहे शेख समीर

शेख समीर हा संभाजीनगर शहरातील बाजीपुरा परिसरातील गल्ली नंबर 19 मध्ये राहणारा भंगार व्यावसायिक असून तो स्वतःला रायडर समजतो. काही दिवसांपूर्वी रायडिंग करताना अपघात झाला होता, त्यानंतर त्याने सोशल मीडियावर रिल्स बनवायला सुरुवात केली. सध्या त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंवर त्याचे दीड लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टासाठी रील बनवताना तो महागड्या गाड्या वापरत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या स्पोर्ट बाईकवर त्याने रिलीज बनवून मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि आपली दहशत निर्माण केली त्या स्पोर्ट बाईकची किंमत तब्बल 16 लाख रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी त्याने महागडी मर्सिडी कारही खरेदी केली होती, पुढे ती विक्री करून फॉर्च्यूनर कार घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!