महाराष्ट्रराजनीति

“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले

उद्धवसेना आणि मनसे यांच्यातील महापालिका निवडणूक जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून मातोश्री आणि शिवतीर्थावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. १९ वर्षानंतर वरळीच्या ज्या एनएससीआय डोमच्या मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. ठाकरे बंधूंच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हीच घोषणा आता उद्या १२ वाजता होणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. यातच काँग्रेसने दिलेला स्वबळाचा नारा, प्रकाश आंबेडकरांशी होणारी आघाडी, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही, असे ते म्हणालेत. तर मुंबईचे सांगता येत नाही. कारण, आघाडी जाहीर करा आम्ही सांगितले तर तर थांबा म्हणतात. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र जात नाही. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, कुणासोबत जायचे. काँग्रेससोबत मुंबईत अद्याप जागा वाटपावर बोलणी सुरू झाली नाही. मात्र, ५० टक्के जागावाटपांवर आम्ही ठाम असल्याचे म्हणाले. कारण, आम्ही नगरपालिकेत काय आहोत, ते दिसले आहे. दुसरीकडे आम्ही मुंबईत २०० जागांवर आमची तयारी आहे. आमचा आग्रह ५०-५० टक्के जागांचा असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!