Uncategorized

Kdmc: पहिली ठिणगी पडली! कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीच्या फॉर्म्युल्याला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये पहिली ठिणगी पडली आहे. भाजप कार्यकर्ते जागा वाटपावरून प्रचंड नाराज झाले आहेत. BJP कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यलया बाहेर जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे वातावरण तापले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका आणि वाटाघाटीनंतर केडीएमसी निवडणुकीत अखेर शिवसेना भाजपा महायुतीचा फॉर्मुला आज ठरला. शिवसेनेला 67 आणि भाजपाला 54 जागा मिळाल्या मात्र कल्याण पूर्वमध्ये अवघ्या सात जागा मिळालेल्या भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काल रात्रीच्या सुमारास भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालया बाहेर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका अन्यथा भाजपा कल्याण पूर्व स्वबळावर लढेल अशी घोषणाबाजी केली .एकंदरीतच महायुती चा फॉर्मुला ठरला असला तरी या फॉर्मुल्यामुळे शिवसेना भाजपा मधील वाद वाढला असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!