Kalyan Dombivli Elections: कल्याण-डोंबिवलीत महायुतीला मोठं खिंडार; भाजप आणि शिवसेनेच्या अनेक दिग्गजांनी मनसेचं इंजिन गाठलं

डोंबिवली: कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारानी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती.. दरम्यान AB फॉर्म वाटपावरून महायुती मधील माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते नाराजी पसरली आहे. काही इच्छुकांनी थेट मनसे कडून AB फॉर्म आणत उमेदवारी अर्ज भरले आहेत.. तर काही ठिकाणी शिवसेना – भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी परस्पर विरोधात फॉर्म भरल्याने एकचं खळबळ माजली असून मोठ्या प्रमाणात बडखोरी होऊ शकते…त्यामुळे महायुती मधील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्याची बडखोरी शमवण्यासाठी पक्षातील वरिष्ठ यांची कसोटी लागणार आहे.
तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची यादी जाहीर केली असून, या यादीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपकडून तिकीट न मिळाल्याने धात्रक दांपत्याने मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय…
या यादीतील सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे भाजपचे माजी दिग्गज नगरसेवक शैलेश धात्रक आणि दिग्गज माजी नगरसेविका मनीषा धात्रक. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने धात्रक दांपत्याने मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मनसेच्या एबी फॉर्मवरून शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि त्यांची मुलगी पूजा धात्रक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धात्रक दांपत्य हे दोन टर्म भाजपचे नगरसेवक राहिले आहेत.




