Uncategorized

Thane : बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा;

Election 2026

Thane: महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष व फुटकळ पक्षांकडून अर्ज दाखल केलेल्या बंडखोरांना ‘पटवण्याकरिता’ सर्वच पक्षांचे नेते मोबाइल कानाला लावून बसलेत. काही शहरांत बंडखोरांना माघार घ्यायला लावून त्या प्रभागातील निवडणूक बिनविरोध करण्याचा नवा फंडा यावेळी प्रकर्षाने जाणवला. काही बंडखोर आपण पैठण्या, नथी वाटल्याने आपले कसे लाखो रुपये खर्च झालेत, याच्या कहाण्या सांगत असून, रिंगण सोडण्याकरिता मांडवलीस तयार आहेत.

मनापासून बिथरलेले बंडखोर आपला मोबाइल बंद करून अज्ञात स्थळी रवाना झालेत. काही देवदर्शनाला तर काही मित्र-आप्तेष्टांच्या फार्महाऊसवर दडी मारून बसलेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाला स्वीकृत नगरसेवकपदाचे, तर कुणाला परिवहन समितीचे ‘गाजर’ दाखवले जात आहे. अर्ज मागे घेण्यास अजून दोन दिवसांचा कालावधी आहे. सीधी उंगली से घी नही निकला, तर मग जुन्या केसेस, उद्योगांची कंत्राटे रद्द करणे, बांधकामांच्या ओसी-एनओसी रोखणे, असे अनेक हातखंडे अंमलात आणण्याची तयारी ठेवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!