Uncategorized

Assembly Election : विधानसभा निवडणुकीतही भोपळाही फुटला नाही, आता भाजपला नडणाऱ्या खासदाराला काँग्रेसने आणले पक्षात…

Mamata Banerjee setback : पश्चिम बंगालमध्ये
पुन्हा सत्ता काबीज करून इतिहास घडविण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही जय्यत तयारी केली आहे. एकही आमदार नसलेल्या काँग्रेसकडूनही चाचपणी सुरू करण्यात आली आहे. या धामधुमीतच ममतादीदींना मोठा धक्का बसला आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार मौसम नूर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. राज्यात तृणमूलला पराभूत करण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. त्यामुळे तृणमूलच्या नेत्यांना खेचण्यासाठी भाजपही प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. मात्र, नूर यांनी भाजप नव्हे तर काँग्रेसला पसंती दिली आहे. त्यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नूर या राज्यसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहे. सोमवारी राज्यसभा सभापतींकडे त्या आपल्या सदस्यत्वाचा राजीनाना सोपवतील. त्यांच्या सदस्यत्वाची मुदत याचवर्षी संपणार आहे. दरम्यान, नूर यांनी काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश, बंगाल काँग्रेसचे प्रभावी गुलाम अहमद मीर आणि प्रदेशाध्यक्ष शुभंकर सरकार यांच्या उपस्थितीत दिल्लील पक्षप्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!