Shivsena UBT BMC Swikrut Nagarsevak: दुर्गे, मांजरेकर, पाठक…; उद्धव ठाकरेंनी BMC मधील स्वीकृत नगरसेवकासाठी कुणाकुणाला निवडले?, यादी समोर

Shivsena UBT BMC Swikrut Nagarsevak: मुंबई महानगरापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
Shivsena UBT BMC Swikrut Nagarsevak: मुंबई महानगरापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांबाबत (BMC Swikrut Nagarsevak) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला संधी द्यायची, याबाबत निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. (Shivsena UBT Swikrut Nagarsevak)
मुंबई महापालिकेत आकडेवारीनुसार प्रत्येक पक्षाला स्वीकृत नगरसेवक मुंबई महापालिकेवर पाठवायचा असेल तर त्यासाठी 22.7 नगरसेवकांचं संख्याबळ हवं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे 65 नगरसेवक आहेत. त्यामुळे तीन स्वीकृत नगरसेवक ठाकरेंची शिवसेना पाठवू शकते. यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावावर (Shivsena UBT Swikrut Nagarsevak) शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांची नाव निश्चित- (Shivsena UBT Swikrut Nagarsevak)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्या कोट्यातून एक स्वीकृत नगरसेवकपद मनसेला देण्याची मागणी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक या तीन जणांची नावं स्वीकृत नगरसेवक म्हणून निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळं मनसेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपद दिलं जाणार नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. 28 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.
यशवंत किल्लेदार काय म्हणाले होते? (MNS Yashwant Killedar)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते आणि नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या 10 झालेली आहे. संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवक मिळतात. भाजप आणि शिंदे गटाला मिळून 6 स्वीकृत नगरसेवक मिळतील. शिवसेनेचा उद्धवजींचा गट आहे त्यांना 3 स्वीकृत नगरेसवक मिळतील तर काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक मिळेल, असं यशवंत किल्लेदार म्हणाले. एमआयएम आणि आमच्याकडे संख्याबळ नसल्यानं तो प्रश्न नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या तीन पैकी एक जागा मिळावी, अशी आमच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे, असं यशवंत किल्लेदार काही दिवसांआधी म्हणाले होते.
स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? (BMC Election 2026 Swikrut Nagarsevak)
स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेद्वारे होत नाही. शहरातील अनुभवी, कार्यकुशल आणि विविध क्षेत्रात (प्रशासन, कायदा, आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक सेवा इ.) योगदान देणाऱ्या व्यक्तींना ही संधी दिली जाते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश अपेक्षित असतो.




